News Flash

‘ही’ माहिती ऑफिसला द्या, अन्यथा टीडीएसपोटी तुमच्या वेतनातून २० टक्के रक्कम कापली जाईल

प्रतिवर्षी अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त वेतन घेणाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रतिवर्षी जर तुम्हाला अडीच लाख रुपये वेतन मिळत असेल, आणि तुम्ही तुमच्या पॅनकार्ड, आधार कार्डाची माहिती मालकाला दिली नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आधार, पॅन कार्डची माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून टीडीएस पोटी २० टक्के रक्कम कापण्याचे निर्देश आयकर खात्याने कंपन्यांना दिले आहेत.

केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी) हा नियम बनवला असून, १६ जानेवारीपासून अंमलात येण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त वेतन घेणाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे. टीडीएस रचनेतून भरला जाणारा कर आणि किती महसूल गोळा होतो त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे.

२०१८-१९ या आर्थिक वर्षात डायरेक्ट टॅक्सच्या तुलनेत टीडीएसमधून ३७ टक्के महसूल जमा झाला. इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम २०६ अअ नुसार कर्मचाऱ्यांना पॅन कार्ड आणि आधार कार्डाची माहिती देणे बंधनकारक आहे असे सीबीडीटीच्या ८६ पानी परिपत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 5:29 pm

Web Title: get ready to pay 20 of your salary as tds if you dont provide pan aadhaar details dmp 82
Next Stories
1 ‘सीपीएसई ईटीएफ’चा सातवा टप्पा लवकरच
2 मंत्री नसतो तर ‘एअर इंडिया’साठी दावा केला असता – पियूष गोयल
3 दूरसंचार कंपन्यांना दिलासा
Just Now!
X