News Flash

गृहनिर्माण क्षेत्र अर्थवृद्धीचा मोठा स्रोत आहे

सध्याचे बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांचे मुल्यांकन २०२० च्या उत्सर्जनाच्या १४ पट आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘एचडीएफसी हौसिंग ओपोरच्युनीटीज फंड सिरीज—१’ ही मुदतबंद योजना सादर केली आहे. या निमित्ताने एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या योजनेचे निधी व्यवस्थापक श्रीनिवास राव राऊरी यांनी ‘लोकसत्ता’शी बातचीत केली –

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक रोज तेजी नोंदवित असताना तुमच्या नव्या फंडात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे?

निर्देशांक नव्याने तेजीचा वरचा स्तर प्रस्थापित करत असले तरी बाजाराचे मुल्यांकन महाग आहे, असे म्हणता येणार नाही. गेल्या अनेक वर्षे कंपन्यांच्या उत्सर्जनात म्हणवी तशी वाढ झालेली नाही. सध्याचे बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांचे मुल्यांकन २०२० च्या उत्सर्जनाच्या १४ पट आहे. बाजार नेहमीच भविष्याकडे पाहात वाटचाल करत असल्याने सध्या व्याजदर ज्या पातळीवर आहेत तसेच ग्राहकांची उपभोग्य  वस्तूंच्या खरेदीची क्षमता लक्षात वाढत आहे. जिनसांच्या किंमती वाढत आहेत. बँकांना अनुत्पादित कर्जापोटी करावी लागणारी तरतूद कमी होताना दिसत आहे. या सर्वाचा परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होण्यात होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. निर्देशांक नवीन उच्चांक प्रस्थापित करीत असले तरी दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी समभाग गुंतवणूक करण्यात धोका नाही.

दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी समभाग गुंतवणूक करण्यात धोका नाही, असे तुमचे म्हणणे असले तरी बाजारचे भांडवली मूल्याचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात ९० टक्क्य़ांपर्यंत पोहचले आहे. या धोक्याच्या घंटेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

भांडवली बाजाराची ऑक्टोबर २०१३ पासून सुरू झालेली घोडदौड अजून कायम असूनही बाजारचे भांडवली मूल्याचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण ९० टक्क्य़ांपर्यंत पर्यंतच पोहचले आहे. मागील काही वर्षे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या  वाढीचा दर सरासरी १५ टक्के असल्याने ही धोक्याची घंटा नसून हा अद्याप गुंतवणूक न केलेल्यांना गुंतवणुकीतील संधीची आठवण करून देणारा नाद आहे.

जगभरातील भांडवली बाजारात आलेल्या तेजीला जगभरात असलेली रोकड सुलभता आणि देशांच्या मध्यवर्ती बँकांची गुंतवणूक स्नेही धोरणे कारणीभूत आहेत असे मानण्यात येते. या व्यतिरिक्त दुसरी काही कारणे आहेत काय?

जगभरातील भांडवली बाजारात आलेल्या तेजीला जगभरात असलेली रोकड सुलभता करण असली तरी भारतीय भांडवली बाजाराबाबत सांगायचे तर परकीय अर्थसंस्थांनी बाजारातील काही गुंतवणूक काढून घेतली तरी वैयक्तिक गुंतवणूकदार आणि देशी अर्थव्यवस्थांच्या सुरू असलेल्या एसआयपीमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.

हे सर्व असले तरी या निमित्ताने मी सांगू इच्छितो की, आशिया खंडातील भूराजकीय  परिस्थितीत बदल झाल्यास त्याचे परिणाम बाजारावर उमटल्या शिवाय राहणार नाहीत.

एचडीएफसी हौसिंग ओपोरच्युनीटीज फंड सिरीजही मुदतबंद योजना आणण्यामागे तुमचा काय उद्देश आहे?

ही योजना सादर करण्यामागची अनेक करणे सांगता येतील. जसे की, अर्थव्यवस्थेच्या वाढत गृहनिर्मिती क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असते. विमान सरकारचे सर्वाना २०२२ पर्यंत पक्की घरे पुरविण्याचे धोरण आहे. परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाला सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत आहे.

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना २०२२ पर्यंत ५ कोटी पक्की घरे बांधण्याचा सरकारचे लक्ष्य आहे. या घरांच्या बांधकामाला चालनादेण्यासाठी सरकारने अशा प्रकल्पांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील पाच वर्षांत गृहकर्जांचे दर २.५ टक्यांनी कमी झाल्यामुळे एकूणच गृहबांधणीला वेग येणार असल्याने या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या संधींचा फायदा घेण्यासाठी आम्ही ‘एचडीएफसी हौसिंग ओपोरच्युनीटीज फंड सिरीज—१’ ही योजना घेऊन आलो आहोत. या योजनेच्या गुंतवणुकीचा विस्तृत परीघ असून या परिघात गृहबांधणी क्षेत्राशी संमंधित घटकांव्यातिरिक्त रंग विद्युत पुरवठा, वातानुकूलीत यंत्रे, काच, भांडवली वस्तू या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असेल.

मुदत बंद योजनाच सादर करण्याचा नेमका उद्देश काय?

गुंतवणूकदारांची संपूर्ण आर्थिक आवर्तनापर्यंत गुंतवणूक असणे अनेकदा आवश्यक ठरते. तेव्हा या धर्तीचा फंड पाहता ती गरजच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:16 am

Web Title: housing sector is a major source of finance growth hdfc housing opportunities fund series
Next Stories
1 निवडणूक रोखे केवळ घोषणाच!
2 स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
3 कर्जबुडव्यांची नाकेबंदी
Just Now!
X