-आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल केला आहे. रिव्हर्स रेपो रेट आणखी २५ अंकांनी कमी करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट आता चार ऐवजी ३.७५ टक्के असेल. रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.)

-आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

-या निर्णयामुळे शेती, छोटे उद्योग आणि घर बांधणी क्षेत्राला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आयएमएफने यंदा २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. जी २० देशांमध्ये हा सर्वाधिक विकास दर आहे.

-आयएमएफनुसार करोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर ७.२ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो असे शक्तीकांत दास म्हणाले.

– वाहनांचे उत्पादन आणि विक्रीमध्ये मार्च महिन्यात मोठी घट झाली. वीजेची मागणी देखील मोठया प्रमाणावर कमी झाली.