19 January 2021

News Flash

शेअर मार्केट कोसळला; सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरला

सोमवारी सेन्सेक्स ५०० अंशांच्या तर निफ्टी १५० अंशांच्या घसरणीने सुरु झाला

संग्रहित छायाचित्र

अर्थसंकल्पात भांडवली बाजार व म्युच्युअल फंडावर उगारलेला करबडगा आणि अमेरिकेतील शेअर मार्केटमधील घडामोडींचे पडसाद सोमवारी भारतातील शेअर बाजारावर उमटले. सोमवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंशांनी तर निफ्टी १५० अंशांनी घसरला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला होता. यात त्यांनी समभागांवरील दीर्घकालीन लाभावरील कर आणि म्युच्युअल फंडांच्या लांभांशांवरील कर प्रत्येकी १० टक्के प्रस्तावित केला होता. शुक्रवारी याचे पडसाद उमटले होते. शेअर बाजारने अडीच वर्षांचा तळ गाठला होता. शुक्रवारी सेन्सेक्स ८४० अंशांनी तर निफ्टी २५६ अंशांनी घसरला होता. यात जवळपास साडे चार लाख कोटी रुपयांची नुकसान झाले होते.

सोमवारी देखील शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. अमेरिकेतील शेअर मार्केटमधील मंदीमुळे सोमवारी आशियातील बहुसंख्य शेअर मार्केटमध्ये घसरण झाली. भारतातही हीच परिस्थिती होती. सकाळी सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरुन ३५ हजारांच्या खाली आला. तर निफ्टीमध्येही १५० अंशांची घसरण झाली. मात्र, काही वेळातच शेअर बाजार सावरला. सोमवारी देखील बँकांच्या शेअरच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2018 9:50 am

Web Title: india share market bse sensex plunges over 400 points nifty by 150 points
टॅग Bse,Sensex,Share Market
Next Stories
1  ‘पत दर्जा’ही धोक्यात!
2 भोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच!
3 संदर्भहीन, ध्येयहीन..
Just Now!
X