शिक्षण, आरोग्य, अन्न आणि गृहनिर्माण या क्षेत्रांवर मोदी सरकार लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्णता आणि शोध या बाबींवर भर दिल्यास भारताला सध्याच्या २ लाख कोटी डॉलरवरून २० लाख कोटी डॉलर अशी झेप घेणे सहज शक्य होईल, असे मत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केले.
‘स्कॉच ग्रुप’ने ‘मुंबई शेअर बाजारा’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ४० व्या ‘स्कॉच समिट’च्या शुभारंभ सत्रात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते यावेळी समीर कोचर लिखित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हा समारंभ मुंबईतील दलाल स्ट्रीटवरील बीएसईमधील आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहात पार पडला.
गांधी यावेळी म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर न्यायचे असेल तर सरधोपट मार्ग सोडून प्रत्येक क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. भारताला २० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्यात कोणती गोष्ट मदत करू शकते? आपण ते सध्या करू शकतो; मात्र त्यासाठी आपल्याला संपूर्णत: नव्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे जे आहे त्यात केवळ अधिक सुधारणा करत हे साध्य होणे शक्य नाही.
गांधी यांनी यावेळी सांगितले की, अगदी छोटे नवीन प्रयोगही सर्वसामान्य भारतीय आणि अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे बदल घडवून आणू शकतात. गायीच्या शेणापासून विटा बनविण्याच्या एका छोटय़ा प्रयोगामुळे त्यांना अतिरिक्त  मला ६०,००० रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारच्या प्रयोगांचा प्रसार आणि त्यांना मदत करणे यासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे.