जिओची हिस्सा विक्री करत मुके श अंबानी यांची मुदतीपूर्वीच वचनपूर्ती

मुंबई : करोना-टाळेबंदीत अनेक व्यवसायांचे कर्ज फुगत असताना अब्जाधीश अंबानी यांनी मात्र रिलायन्सला कर्जमुक्त केले आहे.

टाळेबंदी दरम्यानच १० विदेशी गुंतवणूकदारांच्या सहकार्याने मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉम्र्समधील हिस्साविक्री करत भागधारकांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन मुदतीपूर्वीच पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे धाकटय़ा बंधूच्या थकीत कर्जासाठी बँकांची जप्तीची कार्यवाही सुरू असतानाच थोरले बंधू मुके श अंबानी यांची व्यावसायिक चुणूक समूहाच्या बाजार भांडवलालाही सर्वोच्च टप्प्यावर घेऊन गेली आहे.

मार्च २०२० अखेर १,६१,०३५ कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या ५८ दिवसांत फे सबुकसारख्या आघाडीच्या १० विदेशी गुंतवणूकदारांना जिओ प्लॅटफॉम्र्समधील जवळपास २५ टक्के  हिस्सा विकला आहे. यामुळे समूहावरील कर्ज पूर्णत: फे डले जाणार असून मुख्य प्रवर्तक मुके श अंबानी यांच्या हाती वरकड रक्कम राहणार आहे. टाळेबंदीच्या कालावधीत रिलायन्सने हिस्सा विक्रीतून १,१५,६९३.९५ कोटी रुपये तर हक्कभाग विक्रीतून ५३,१२४.२० रुपये उभे के ले आहेत.

अंबानी यांनी रिलायन्सच्या ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, समूहावरील कर्ज मार्च २०२१ पर्यंत फे डण्याचे आश्वासन भागधारकांना दिले होते. मात्र १० महिन्यांतच ते फे डण्यात आले असून त्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे. २२ एप्रिल रोजी फे सबुकने रिलायन्स जिओ प्लॅटफॉम्र्समधील हिस्सा खरेदी के ल्यानंतर सौदी अरेबियाच्या पीआयएफ गुंतवणूक कं पनीने १८ जून रोजी गुंतवणूक करत समूहासाठीच्या दहाव्या फे रीची पूर्तता के ली.

११ लाख कोटींचा बाजार भांडवल टप्पा

रिलायन्स ११ लाख कोटी रुपयांचा बाजार भांडवल टप्पा गाठणारी देशातील एकमेव सूचिबद्ध कं पनी ठरली आहे. मुंबई शेअर बाजारात सत्रात प्रति समभाग विक्रमी १,७८८ रुपये मूल्य गाठल्यानंतर कं पनीचे बाजार भांडवली दिवसभरात ६५,४७७.०३ कोटी रुपयांनी वाढले. चालू वर्षांत कं पनीचा समभाग आतापर्यंत १६.२० टक्क्यांनी झेपावला आहे. १.५९ पट प्रतिसादी हक्कभाग विक्रीने दशकात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.