केजी-डी ६ क्षेत्रातील विहिरीतून रिलायन्सला यंदा कमी नैसर्गिक वायू उत्पादन झाला आहे. येथून सध्या दिवसाला १२ दशलक्ष स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर उत्पादन होत आहे, अशी माहिती कंपनीच्या उत्पादन विभागाचे मुख्य चलन अधिकारी बी. गांगुली यांनी दिली. गेल्याच महिन्यात येथून १२ दशलक्ष स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर उत्पादन झाले होते. सध्या येथील विहिरींमध्ये पाणी आणि वाळूचा शिरकाव होत असल्याने वायू उत्पादन कमी होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मार्च २०१० मध्ये कंपनीने सर्वोच्च ७० दशलक्ष स्टॅण्डर्ड क्युबिक मीटर उत्पादनाची नोंद केली आहे. मात्र कंपनी पूर्ण क्षमतेने उत्खनन करत नसल्याचा ठपका ठेवत सरकारने येथून कमी उत्पादन होत असल्याचे अमान्य केले आहे. कमी उत्पादनापोटी सरकारने कंपनीला दंडही ठोठावला आहे. २०१२-१३ या कालावधीतील ही रक्कम ७९२ अब्ज डॉलर आहे. केजी डी ६ खोऱ्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने एप्रिल २००९ मध्ये वायू उत्पादनास सुरुवात केली. परिसरात कंपनीच्या १८ विहिरी आहेत. पैकी १० सध्या बंदच आहेत.