केशनिगेशी संलग्न आघाडीची नाममुद्रा ‘रिचफील’ने पुढील दोन वर्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर विस्तार आणि वृद्धीच्या योजना आखल्या असून त्यात त्यांच्या चिकित्सा केंद्रांचे जाळे शंभरावर विस्तारले जाणार आहे. कंपनी आपल्या कार्यान्वयाची तीस वर्षे सध्या साजरी करत आहे. डॉ. अपूर्व शाह आणि डॉ. सोनल शाह या केशविज्ञानतज्ज्ञांनी १९८६ साली स्थापना केलेल्या ‘रिचफील’ने आतापर्यंत केसांच्या आणि टाळूच्या छोटय़ा आणि मोठय़ा समस्यांसाठी तब्बल पाच लाख लोकांवर उपचार केले आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पेटंट असलेल्या उपचारांचा आणि ट्रायो-अ‍ॅक्टीव्ह औषधांचा वापर केला आहे. सध्या ‘रिचफील’ची २५ भारतीय शहरांमध्ये ७५ क्लिनिक आहेत आणि चालू आर्थिक वर्षांत आणखी १२ चिकित्सालयांची भर पडेल. दुबई आणि अबूधाबी येथे नियोजित दोन केंद्रांसह पुढील दोन वर्षांत १०० केंद्रांचे लक्ष्य गाठले जाईल. ‘रिचफील’ने ११५ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली. या बाजारपेठेतील वृद्धीचा दर आणि विस्तार कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर पुढील दोन वर्षांत उलाढालीचा हा आकडा १७५ कोटी रुपयांवर जाईल, असा डॉ. शहा यांचा विश्वास आहे.