News Flash

रॉय यांना बोलणीसाठी दहा दिवसांची मुभा

जामीनापोटी भरावयाच्या रकमेकरिता मालमत्ता विक्री बोलणीसाठी सहाराचे अध्यक्ष सुब्रता रॉय यांना दहा दिवसांच्या कालावधीची मुभा देण्यात आली आहे.

| August 2, 2014 03:10 am

जामीनापोटी भरावयाच्या रकमेकरिता मालमत्ता विक्री बोलणीसाठी सहाराचे अध्यक्ष सुब्रता रॉय यांना दहा दिवसांच्या कालावधीची मुभा देण्यात आली आहे. यासाठी नवी दिल्लीच्या तिहार तुरुंग परिसरातच अद्ययावत परिषद कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगळवार, ५ ऑगस्टपासून कार्यालयीन कामकाजाचे दहा दिवस सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान रॉय हे त्यांची मालमत्ता विक्रीसाठी भागीदारांशी चर्चा करू शकतील. यावेळी त्यांच्याबरोबर न्यायालयातील दोन वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉप, प्रिन्टर यासह तीन जणांना या कक्षात प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे.
रॉय तसेच सहाराविरुद्ध सेबीने कारवाई करत हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात नेले होते.
गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगाआड असलेल्या ६५ वर्षीय रॉय यांनी न्यायालयात जामीनापोटी जमा करावयाच्या १० हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी सहाराच्या विदेशातील मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी रॉय यांनी यापूर्वी आपल्याला नजरकैदेत ठेवण्याची मागणीही केली होती. यासाठी आईच्या आजाराचे कारण देणाऱ्या रॉय यांची मागणी धुडकावत न्यायालयाने तुरुंगात मालमत्ता विक्रीविषयीच्या बोलणीची तयारी करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:10 am

Web Title: sahara groups subrata roy gets relief sc clears shift from lock up to tihar jail hall
टॅग : Sc,Subrata Roy
Next Stories
1 वाहन उद्योगाची भरभराट कायम
2 पाच वर्षांत एक अब्ज रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत!
3 ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून
Just Now!
X