News Flash

प्रमुख निर्देशांकांची विक्रमापासून माघार

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास पाऊण टक्क्यापर्यंत वाढले.

सेन्सेक्स, निफ्टीत अखेर घसरण; स्थिर व्याजदराचा परिणाम नाही

मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सप्ताहअखेर त्यांच्या वरच्या टप्प्यापासून माघारी फिरले. शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान रिझर्व्ह  बँकेच्या व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयावर परिणाम झाला नाही.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३२.३८ अंश घसरणीसह ५२,१००.०५ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २०.१० अंश घसरणीने १५,६७०.२५ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात पाव टक्क्यापर्यंत घसरण नोंदली गेली.

परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेतील कमकुवत रुपया तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढत्या किमती यांचाही काहीसा नकारात्मक परिणाम भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात दिसून आला.

सेन्सेक्ससह निफ्टीने गुरुवारी निर्देशांकांची ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात करताना दोन्ही प्रमुख निर्देशांक उलट तेजीत होते. मात्र सकाळच्या सत्रातच रिझर्व्ह  बँकेने स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केल्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चालू वित्त वर्षासाठी कमी केलेल्या विकास दर अंदाजाचा हा परिणाम होता.

सेन्सेक्समध्ये नेस्ले इंडिया सर्वाधिक जवळपास दोन टक्क्यांसह घसरला. तसेच स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक या बँक समभागांची अधिक प्रमाणात विक्री झाली. त्याचबरोबर टायटन कंपनी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागांनाही नुकसान झाले. तर बजाज फिनसव्र्ह, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड यांचे मूल्य अडीच टक्क्यांपर्यंत वाढले.

सलग काही व्यवहारात विक्रमी स्तर गाठणाऱ्या निफ्टी तसेच दोन महिन्यानंतर नव्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलेल्या सेन्सेक्सने चालू सप्ताहात मात्र उत्साहवर्धक कामगिरी केली. या दरम्यान सेन्सेक्स ६७७.१७ अंशांनी तर निफ्टी २३४.६० अंशांनी झेपावला आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे १.३१ व १.५१ टक्के राहिले आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये शुक्रवारी बँक, ऊर्जा, आरोग्यनिगा आदी जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले. तर तेल व वायू, भांडवली वस्तू, पोलाद आदींमध्ये मात्र नाममात्र वाढ नोंदली गेली.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास पाऊण टक्क्यापर्यंत वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 12:19 am

Web Title: sensex nifty interest rate index akp 94
Next Stories
1 निप्पॉन इंडिया फार्मा फंडाचा ५,००० कोटींचा टप्पा
2 अदानी इलेक्ट्रिसिटीचा‘हरित दर पुढाकार’ उपक्रम
3 जुलैपासून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल – मुख्य आर्थिक सल्लागार
Just Now!
X