05 April 2020

News Flash

सेन्सेक्स नव्या ऐतिहासिक उंचीवर

शुक्रवारची तेजी कामय राखत मुंबई शेअर बाजाराने नव्या सप्ताहाची सुरुवातच मोठय़ा झेपेसह केली.

| December 10, 2013 08:31 am

व्यवहाराच्या सुरुवातीलाच २१ हजारापुढे जात त्याने लगेचच २१,४८३ हा सर्वोच्च स्तर गाठला. यावेळी ४८७ अंशांची वाढ नोंदली गेली. दिवसअखेरही सेन्सेक्स ३३० अंशांच्या वाढीने अखेर करत २१,३२६ या नव्या उच्चांकावर स्थिरावला. सेन्सेक्सने ३ नोव्हेंबरचा वरचा टप्पा यावेळी खाली खेचला.
राष्ट्रीय शेअर बाजारानेही सोमवारी ६,४१५ पर्यंत झेप घेत दिवसअखेर १०४ अंश वाढीने ६,३६४ केली. निफ्टीने मात्र २००८ (६,३५७)  नंतर  गेल्या महिन्यात पाहिलेली सर्वोच्च पातळी सोमवारच्या रुपात पुन्हा अनुभवली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदविली.
पाच राज्यातील मतदानोत्तर चाचणीमध्येही जनतेचा कौल भाजपालाच मिळाल्याने शुक्रवारीदेखील शेअर बाजार २५० अंशांने हर्षोल्हास करता झाला होता.
१० पैकी निम्मे समभाग वधारले होते. तर ९९ समभागांनी त्यांचा वर्षांतील उच्चांक गाठला. यामध्ये अ‍ॅक्सिस बँक, बायोकॉन यांचा समावेश होता. (याचबरोबर १०५ समभाग वर्षांच्या तळालाही आले.) १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत नोंदले गेले. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले.  सोमवारच्या सेन्सेक्सच्या नव्या उंच्चांकाने गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात ७५ हजार कोटी रुपयांनी उंचावली.
भांडवली बाजारातील ही तेजी पाहून आणि विदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा ओढा लक्षात घेता येत्या वर्षांत केंद्रात येणारे नवे सरकार अर्थविकासाला चालना देणारे, उद्योगजगताच्या हिताचे निर्णय घेणारे असेल, या अंदाजावर बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्चसह अनेक मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी आगामी पथप्रवास आशादायक वर्तविला.
२०१३ संपण्यास काही दिवसांचाच कालावधी असताना आता डिसेंबरअखेर सेन्सेक्स २२ हजार तर निफ्टी ७ हजाराचा टप्पा गाठेल, असेही आता म्हटले जात आहे. उद्योग संघटनांकडूनही आता अर्थविकासाचीच अधिक अपेक्षा केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2013 8:31 am

Web Title: sensex on the new historical height
Next Stories
1 दोन महिन्याच्या उच्चांकावर रुपया
2 ‘जे अ‍ॅण्ड के बँके’चे २०१६ पर्यंत १,८०० कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट
3 सूक्ष्म, लहान व मध्यम कंपन्यांना सिडबीकडून वर्षभर रोखतेचे पाठबळ
Just Now!
X