मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०५ अंशांनी मंगळवारच्या व्यवहारात गडगडला. जागतिक शेअर बाजाराचा घसरणीच्या कलाचे पडसाद आपल्या बाजारात अधिक तीव्रतेने उमटले. सेन्सेक्सने दिवसअखेरीस ८५५ अंशांच्या (३.०७%) घसरणीसह २६,९८७ वर विराम घेतला. ६ जुलै २००९ नंतरची ही सेन्सेक्सची ही सर्वात मोठी घसरगुंडी आहे. तर शेअर बाजाराच्या इतिहासातील ही प्रमुख निर्देशांकाची आठवी मोठी घसरण आहे. या घसरणीमागे नेमकी कारणे काय?