आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक शिखर सर केला असून सेन्सेक्सने ३९ हजारचा पल्ला ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ११, ७०० चा टप्पा ओलांडला आहे.

२०१८-१९ या चालू वित्त वर्षांतील सेन्सेक्स तसेच निफ्टीचा प्रवास गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला. या दरम्यान मुंबई निर्देशांक १७.३० टक्क्यांनी तर निफ्टी १४.९३ टक्क्यांनी वाढला होता. दुहेरी अंकवाढ मिळवून देणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सरत्या आर्थिक वर्षांत ८.८३ लाख कोटी रुपयांची भर पडली होती.  सोमवारी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साह दिसून आला.

सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला आणि सेन्सेक्सने ३९, ००० चा पल्ला ओलांडला. तर निफ्टीने ११, ७०० चा पल्ला गाठला. निफ्टीने यापूर्वी ३ सप्टेंबर २०१८ रोजी ११, ७०० चा टप्पा ओलांडला होता. सेन्सेक्सने सुरुवातीला उसळी घेतली असली तरी काही वेळात सेन्सेक्स ३८, ९४१. ११ अंकांवर स्थिरावला.