News Flash

सुभाष चंद्र  यांचा ‘झी’चा राजीनामा

सुभाष चंद्र हे कंपनीचे बिगरकार्यकारी संचालक म्हणून काम करतील.

(संग्रहित छायाचित्र)

वाढता कर्जभार कमी करण्यात आलेल्या अपयशानंतर कंपनीवरील वर्चस्व सोडावे लागलेल्या सुभाष चंद्र यांनी सोमवारी झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

सुभाष चंद्र हे कंपनीचे बिगरकार्यकारी संचालक म्हणून काम करतील. याबाबतचा निर्णय झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने मंजूर केला आहे. त्याचबरोबर एस्सेल समूहाचे पुनित गोएंका हे ‘झी’वर प्रतिनिधित्व करतील. ‘झी’च्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत सहा स्वतंत्र संचालकही नियुक्त केले. या सर्व निर्णयांना आता कंपनीच्या भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे.

सुभाष चंद्र यांनी गेल्या आठवडय़ात एस्सेल समूहाचा हिस्सा कमी केला होता. समूहावरील वाढता कर्जभार विस्तारल्यानंतर निधी उभारणीत समूहाला अपयश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:55 am

Web Title: subhash chandras resignation of zee akp 94
Next Stories
1 अपत्य असलेल्या कुटुंबियांकडून मुदतविम्याला मागणी
2 म्युच्युअल फंड बंद होऊ  शकतो का?
3 सेन्सेक्स ४१ हजारानजीक!
Just Now!
X