News Flash

अतुल राजोळी ‘उद्योगतारा’ पुरस्काराने सन्मानित

बाजारपेठेत तग धरून रहायचे असल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना सातत्याने चालना देत राहणे ही आजच्या उद्योगविश्वाची निकड आहे.

| January 11, 2013 12:17 pm

बाजारपेठेत तग धरून रहायचे असल्यास लघू आणि मध्यम उद्योगांना सातत्याने चालना देत राहणे ही आजच्या उद्योगविश्वाची निकड आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन उद्योगजगतात सातत्याने व ध्येयध्यासाने काम करणाऱ्या ‘बॉर्न २ विन’ या संस्थेच्या अतुल राजोळी यांना ‘उद्योगतारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 शनिवारी नेहरू सेंटर येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या मराठी बिझनेस क्लबच्या वार्षकि मेळाव्यात त्यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विको लॅबचे संस्थापक गजानन पेंढारकर यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमास मराठी व्यापार मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर व दरेकर ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष अरूण    दरेकर व पोलीस अधिकारी संजय गोविलकर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 12:17 pm

Web Title: udyogtara award given to atul rajoli
टॅग : Arthsatta,Award
Next Stories
1 औद्योगिक उत्पादन शून्याखाली
2 कंपन्यांमधील किमान हिस्सा सरकारकडून मुदतीत पालन निश्चितच : सेबी
3 वाहन विक्रीचानऊ वर्षांतील नीचांकाकडे सूर
Just Now!
X