पर्यावरणावर भर व पारंपरिक इंधनांवरील वाहनांवरील र्निबध याचा परिणाम विजेरी वाहनांची विक्री वाढण्यावर झाला आहे. २०१५-१६ मध्ये २२,००० विजेरी वाहने विकली गेली असून वार्षिक तुलनेत त्यातील वाढ ही ३७.५० टक्के आहे.
आधीच्या, २०१४-१५ या आर्थिक वर्षांत भारतातील विजेरी वाहनांची विक्री १६,००० झाली होती. गेल्या आर्थिक वर्षांत विक्री झालेल्या विजेरी वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक राहिले असून तुलनेत चार चाककी वाहनांची विक्री २,००० झाली आहे. तर गिअरलेस स्कूटरचा वरचष्मा असलेल्या दुचाकीची गेल्या आर्थिक वर्षांत २०,००० विक्री झाली.
सरकारचे २०२० पर्यंत ६० लाख विजेरी वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य असून या क्षेत्राचा प्रवास तूर्त संथच असल्याचे ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रीक व्हेकल्स’ (एसएमईव्ही) चे संचालक (कंपनी व्यवहार) सोहिंदर गिल यांना म्हटले आहे.