आघाडीची दलाली पेढी व वित्तीय सेवा संस्था एजंल ब्रोकिंग प्रा. लि.ने ई-केवायसीच्या पल्याड जाणारी अनोखी व अतिजलद ‘डी-केवायसी’ (डिजिटल केवायसी) प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने खास तयार केलेले बिनतारी डी-केवायसी टॅबलेट्स असलेला तब्बल १००० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समूह प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचून ही ‘केवायसी’ (ग्राहकांचा इत्थंभूत तपशील नोंदविणारी) प्रक्रिया पार पाडणार आहे. कंपनीने यासाठी ‘आधार’ माहितीशी संलग्नता साधणारी आपली विशेष ई-केवायसी सॉफ्टवेअर प्रणालीही विकसित केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2016 रोजी प्रकाशित
एंजल ब्रोकिंगकडून जलद ‘डी-केवायसी’
आघाडीची दलाली पेढी व वित्तीय सेवा संस्था एजंल ब्रोकिंग प्रा. लि.ने ई-केवायसीच्या पल्याड
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 19-05-2016 at 07:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angel broking launches digital kyc facility