मुंबई : बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी २०२२-२३ वर्षांसाठी भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’चे अध्यक्ष म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यांनी संघटनेचे मावळते अध्यक्ष आणि टाटा स्टील लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्याकडून पदभार स्वीकारला.

बरोबरीने हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल हे २०२२-२३ वर्षांसाठी सीआयआयचे पदनामित अध्यक्ष आहेत, तर टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. दिनेश यांनी सीआयआयचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे स्नातक असलेले संजीव बजाज हे अनेक वर्षांपासून सीआयआय अंतर्गत राज्य, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. ते २०२१-२२ साठी पदनामित अध्यक्ष आणि २०१९-२० मध्ये पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवन मुंजाल हेही मागील ३० वर्षांपासून सीआयआयशी वेगवेगळ्या भूमिकांत संलग्न राहिले आहेत.