युरोपीय महासंघाने भारतातून येणाऱ्या आंब्यावर बंदी आणली असली तरी त्याचा एकूण निर्यातीच्या दृष्टीने परिणाम नगण्य असेल, असे कृषी निर्यातीच्या प्रोत्साहनासाठी कार्यरत संस्था ‘अपीडा’ने प्रतिपादन केले आहे. २०१२-१३ सालात भारताने ५५,००० टन आंब्याची एकूण निर्यात केली, त्यापैकी युरोपीय महासंघाचा हिस्सा ४,००० टनांचा होता. भारतीय आंब्याची प्रामुख्याने अमेरिका, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांना निर्यात होते. त्यापैकी ७० टक्के आंबा हा आखाती देश व न्यूझीलंडमध्ये जातो.