मनीलाइफ फाऊंडेशनला यंदाचा एम आर पै स्मृती पुरस्कार
मुंबई : पीएमसी बँकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेचा एम आर पै स्मृती पुरस्कार बुधवारी झालेल्या समारंभात जनमानसात आर्थिक साक्षरतेच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मनीलाइफ फाऊंडेशनला प्रदान करण्यात आला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यकारी संचालिका डॉ. दीपाली पंत जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश आणि गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून, यंदाचे हे पुरस्काराचे १० वे वर्ष आहे. पीएमसी बँकेचे अध्यक्ष सी. एस. चढ्ढा, कार्यकारी संचालक जॉय थॉमस तसेच ऑल इंडिया बँक डिपॉझिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. भंडारे या प्रसंगी उपस्थित होते.
महाबँकेचा ८०व्या स्थापना दिनी ‘ग्राहकबंध’
पुणे : ‘सर्वसामान्यांची बँक’ या बिरुदाला जागत आपल्या निष्ठावान ग्राहकांना एकत्र आणत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक)ने आपला ८० वा स्थापना दिन मंगळवारी देशभरातील आपल्या शाखांमध्ये साजरा केला. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत यांनीही पुणे येथे आयोजित ‘ग्राहकबंध’ सोहळ्यात सहभाग केला. या प्रसंगी मुनोत यांनी नव्या पिढीशी नाते जुळविताना, इंटरनेट बँकिंगचा सुलभ व सुरक्षित वापरासाठी उपयुक्त ‘महासिक्युअर’ या बँकेच्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह शहरातील सर्व थरातील प्रतिष्ठित खातेदार या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business news
First published on: 19-09-2014 at 04:27 IST