सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेची उपकंपनी कॅनबँक व्हेंचर कॅपिटल फंड लि.ने पुण्यानजीक उत्पादन प्रकल्प असलेल्या आनंद टेक्नो एड्स इंजिनीयरिंग इंडिया या कंपनीतील ५ टक्के भागभांडवल १६ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ताब्यात घेतल्याचे सोमवारी जाहीर केले.
कॅनबँक व्हेंचरच्या ४३५ कोटींची गंगाजळी असलेल्या ‘इमर्जिग इंडिया ग्रोथ फंडा’तून ही गुंतवणूक केली गेली आहे.
भारतात तसेच आखातातील तेल आणि वायू क्षेत्रासाठी अभियांत्रिकी उत्पादने व बॉल व्हॉल्व्हज्ची निर्मिती आनंद टेक्नोकडून केली जाते. या गुंतवणुकीचा विनियोग पुण्यानजीक असलेल्या उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी आनंद टेक्नोकडून केला जाणार आहे, असे कॅनबँक व्हेंचरचे व्यवस्थापकीय संचालक एस. थिरुवाडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्याची २३६ कोटींची वार्षिक उलाढाल आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ६०० कोटींपर्यंत उंचावण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.