पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील कागदपत्रात बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेबाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, केवळ त्या शेतकऱ्यांनाच पीएम किसानचा लाभ मिळणार आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा राशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहेत. या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..

काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार, युपीमध्ये ७ लाख शेतकरी आहेत, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या १०व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण हे शेतकरी या योजनेत अपात्र आढळले आहेत. त्यामुळे अटी व शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी २००० रुपये याप्रमाणे ४० लाख रुपये परत मिळतील, असं म्हटलं जातंय. माहितीसाठी, पीएम किसान योजनेंतर्गत, प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

वार्षिक हप्ता कधी जारी केला जातो?

पहिला हप्ता – एप्रिल-जुलै

दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर

तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च

यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करा.

उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.

त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.

आता पर्यायातून Beneficiary Statusवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाइल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.

वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्हाला तुमचे नाव तिथे दिसेल.