आयसीआयसीआय बँकेने गेल्या आठवडय़ात दादरमधील (पश्चिम) शिवाजी पार्क येथे नाणे हस्तांतर मेळावा आयोजित केला होता. भारतीय रिझव्र्ह बँकेच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सर्वसमावेशकता विभागाचे सर व्यवस्थापक सी. पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यंदाच्या मेळाव्यात १,५०० जण सहभागी झाले. १०, ५, २ व १ रुपयांच्या ५ लाख रुपये मूल्यांच्या चलनी नाण्यांची या वेळी देवाण-घेवाण झाल्याची माहिती देण्यात आली. सर्वसामान्यांना स्वीकार्ह खराब व विविध प्रकारच्या चलनी नोटांऐवजी नव्या नोटा व नाणी देण्यासाठी आयसीआयसीआय बँक विशिष्ट काळाने नाणे हस्तांतर मेळावा आयोजित करत असते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2015 रोजी प्रकाशित
आयसीआयसीआय बँकेचा नाणे हस्तांतर मेळावा
सर्वसमावेशकता विभागाचे सर व्यवस्थापक सी. पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-12-2015 at 05:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coin transfer rally of icici bank