भांडवली बाजारातील व्यवहारामार्फत गैररित्या मिळविलेल्या १० लाख रुपये प्रकरणात बाजार नियामक सेबीने जागरण प्रकाशनचे कंपनी सचिव व त्याची पत्नी यांना दोषी ठरविले आहे. अमित जैस्वाल व मानसी जैस्वाल यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर २००९ दरम्यान केलेल्या कंपनी समभागांच्या गैरव्यवहारात ही कारवाई करण्यात आली आहे.
माध्यम समूहाची मालकी असलेल्या कांचन प्रॉपट्रीजने समभाग विकून ४० ते ४२ कोटी रुपये उभारण्याची प्रक्रिया राबविली होती. या प्रकरणात जैस्वाल दाम्पत्याने व्यवहार करताना समभागांच्या मूल्यावर विपरित परिणाम होईल, असे वर्तन केल्याचे नियामकाला केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. याद्वारे जैस्वाल दाम्पत्याला आर्थिक लाभही झाल्याचे सेबीने पत्रकात नमूद केले आहे.