अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादस्थित ग्लोबल हॉस्पिटल समूहाचे अद्ययावत ४५० खाटांचे खासगी रुग्णालय १५ ऑगस्टला सुरू होत आहे. ४५० खाटा, १०० अतिदक्षता विभाग, १५ शस्त्रक्रिया विभाग असलेले हे रुग्णालय परळच्या सार्वजनिक केईएम व टाटा रुग्णालयापासून नजीक आहे.
विशेषत: दक्षिणेत प्राबल्य असलेल्या ग्लोबल समूहाने मुंबईमार्गे पश्चिम भारतात प्रथमच शिरकाव केला आहे. देशभरात ९ साखळी रुग्णालये चालविणाऱ्या या समूहाची २,००० खाटांची क्षमता आहे. किडनी, हृदय आदी चार प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुंबईत मोजके पर्याय असताना ग्लोबलच्या माध्यमातून या शस्त्रक्रियांचे दालन रुंदावणार आहे.
अन्य खासगी रुग्णालयातील संबंधित शस्त्रक्रियांच्या तुलनेत १० टक्के स्वस्त उपचार होतील, असा दावा ग्लोबल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्र कारंजेकर यांनी केला. या शस्त्रक्रियांसाठी मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये पुरेशी सुविधा नसल्याने त्यासाठी विदेशात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वर्षांला १५० पर्यंत गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्णत: खासगी स्वरूपाच्या आणि विशेषत: कॉर्पोरेट जगताला पंचतारांकित सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयासाठी १५० कोटी रुपयांची निधी उभारणी जागतिक बँकेने केली आहे. फोर्टिस, डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उभारणीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या डॉ. कारंजेकर यांच्याकडे या नव्या रुग्णालयाची जबाबदारी आहे.
रुग्णालयात सध्या ४५० वैद्यक मनुष्यबळ असून ते नजीकच्या कालावधीत दुप्पट करण्याची मनीषाही त्यांनी व्यक्त केली. सध्याचे वाढते वयोमान पाहता देशात आणखी १०० ते ५०० अवयव प्रत्यारोपण सुविधा असणाऱ्या रुग्णालयांची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
काही ‘ग्लोबल’ पायंडे :
* अतिदक्षता विभागात मृत्यू ओढविणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९० टक्के असून अशा रुग्णांवर रात्रीच्या वेळीही उपचार तसेच देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक विभागामागे एक वरिष्ठ तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार नेमण्यात येणार आहे.
* मुंबईसारख्या शहरात रुग्णांच्या थेट घरी जाऊन आठवडय़ातून एकदा उपचार करणाऱ्या १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चमू उभारण्यात येणार असून ही सुविधा उपनगरात वांद्रे व घाटकोपपर्यंत असेल.
* परळ परिसरातील काही गृहसंकुलांमध्ये स्थायी ‘मेडिकल रूम’ उभारण्यात येणार असून येथे उपलब्ध असलेल्या गॅझेटमार्फत रहिवाशी स्वत:हून त्यांचे ईसीजी व अन्य चाचण्या करू शकतील व त्यासंबंधीचा रिपोर्ट लगेचच रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दूरनियंत्रित प्रणालीद्वारे मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2013 रोजी प्रकाशित
ग्लोबल समूहाचे मध्य मुंबईत‘कॉर्पोरेट’ रुग्णालय
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादस्थित ग्लोबल हॉस्पिटल समूहाचे अद्ययावत ४५० खाटांचे खासगी रुग्णालय १५ ऑगस्टला सुरू होत आहे. ४५० खाटा, १०० अतिदक्षता विभाग, १५ शस्त्रक्रिया विभाग असलेले हे रुग्णालय परळच्या सार्वजनिक केईएम व टाटा रुग्णालयापासून नजीक आहे.
First published on: 26-04-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporate hospital in central mumbai by global group