व्यासंगी शिक्षक कुणाला म्हणायचे याची एक मजेशीर व्याख्या पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात की, जो शिक्षक सोप्यातला सोपा विषय जास्तीत जास्त गुंतागुंतीचा करून शिकवतो त्याला व्यासंगी म्हणायचे! यातील विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी आजकाल सर्वच क्षेत्रात असे ‘व्यासंगी’ वक्तेदेखील आढळून येतात आणि मग त्यांच्या व्याख्यानातून माझ्या पदरात काय पडले असा प्रश्न बाकी राहतो! शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्वत: अभ्यास करूनच ते करा असा उपदेश अनेक जण करतात. यातून दोन प्रश्न उभे राहतात. तर मग तुम्हाला ऐकायला आम्ही आलो आहोत तर काही तरी दिशा सांगा ना! दुसरे म्हणजे अभ्यास करायचा तो कसा? स्टॉक एक्स्चेंजमध्ये सात हजारांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्या सर्वाचा अभ्यास करायचा म्हटले तर आयुष्य कमी पडेल. आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचत राहायचे सेवानिवृत्त होता होता कुठे तिचा अर्थ कळायला लागतो तसेच!
नामवंत इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट नितीन खंडकर यांचे व्याख्यान ऐकताना एक वेगळा पण सुखद अनुभव आला. सामान्य गुंतवणूकदारांना तो एक दिलासा होता. खंडकर म्हणतात फंडामेंटल अॅनालिसिस समजायला प्रगाढ पंडित असायची गरज नाही. ते म्हणतात की, १७ हजारांहून अधिक शाखा पंखाखाली घेऊन बसलेली बलाढय़ अशी स्टेट बँक ऑफ इंडिया हे एक उत्तम उदाहरण आहे. एक लाख रुपये स्टेट बँकेत मुदत ठेव म्हणून १० वर्षांपूर्वी ठेवता तर त्या ऐवजी ५० हजार रुपये ठेवा आणि उरलेले ५० हजार रुपयांचे त्या बँकेचे शेअर्स घ्या ना! २००३ साली ५३० रुपये भाव असलेला तो शेअर सांप्रत १७९० च्या आसपास असल्याने तिप्पट वृद्धी झाली आहे. १० टक्के मुदत ठेवीवरील व्याज धरून दहा वर्षांत दुप्पट होणारी रक्कम शेअर्सच्या बाबतीत तिप्पट झाली आहे. अर्थात हे सर्वच बँकांच्या बाबतील होईल असे नाही किंवा या बँकेच्या बाबतीत दर वर्षी होत राहील असेही नाही. या दहा वर्षांच्या काळात अनेकदा तो शेअर २०००च्या आसपास पोचला होता. बरे शेअर्स विकून येणाऱ्या पशावर आयकर नसतोच (जर ते एक वर्षांहून अधिक काळानंतर विकले असतील). दुसरे उदाहरण त्यांनी सांगितले ते गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स या शेअरचे. सन २००३ मध्ये ३६ रुपये भाव असलेल्या या शेअरचा भाव २०१३ मध्ये सध्या ८५० रुपये आहे. १० वर्षांत झालेली ही वृद्धी लक्षात घेता त्या कंपनीत मुदत ठेव म्हणून जरी १५ टक्के व्याजाने पसे ठेवले असते तरी जास्तीत जास्त किती परतावा मिळाला असता हे गणित केले तर खंडकर म्हणतात तसे अशा प्रकारच्या आणखी अनेक चांगल्या कंपन्यांत मुदत ठेव आणि त्याबरोबरच तिचे शेअर्सही घ्या. कुणी म्हणेल हे २०१३चे सांगता. पण २०१०मध्येदेखील या शेअरचा भाव ४३० रुपये होताच की! ही टीप नसून घडलेले एक उदाहरण आहे. ही सर्व माहिती शोधण्यासाठी खूप वेबसाइट्स उपलब्ध असतात.
सुजाता पाटील यांचा प्रश्न असा आहे त्यांचे लग्न झाल्यामुळे बँक आणि डिमॅट खात्याचे काय करणार? खाती माहेरच्या नावाने आहेत. बँकेला एक पत्र देणे आवश्यक आहे त्याबरोबर केवायसी कागदपत्रे आणि विवाह दाखला जोडल्यास बँक बचत खात्यातील नाव बदलून नवीन म्हणजे सासरचे नाव टाकेल त्यात कसलीही गुंतागुंत नाही. डिमॅट खात्यातील नाव बदलता येत नाही असे मी मागे लिहिल्याचे त्या म्हणतात. मी मागे असे लिहिले होते किंवा बोललोही होतो कारण तेव्हा तसा नियम होता. सांप्रतच्या सेबीच्या नियमानुसार विवाह झाल्यानंतर स्त्रीच्या डिमॅट खात्याचे नाव बदलता येते आणि तोच खाते क्रमांक राहतो. त्यासाठी वरीलप्रमाणे कागदपत्रे डीपीकडे सादर करायला लागतात. सुयोग लोखंडे यांच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की जेव्हा आपण शेअर्स सर्टििफकेट्स डिमॅट करायला डीपीकडे देता आणि ती सुमारे १५ दिवसात डिमॅट होतात तेव्हा त्यावर आयकर लागत नाही. कर तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही शेअर्स विकणार तेव्हा. अर्थात एक वर्षांनंतर विकलेत तर तोही प्रश्न नाही. कारउ कोड आणि टकउफ कोडबाबत अखिलेश ठाकूर यानी विचारले आहे. Indian Financial System Code अंकी असतो. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेसाठी वेगवेगळा असतो.  NEFT यंत्रणेद्वारे पसे पाठवताना तो आवश्यक असतो.         अर्थात टकउफ हा  Magnetic Ink Character Recognition अर्थात MICR WF नऊ अंकी असतो.  उदाहणार्थ ४०००१३०५१ हा बँक ऑफ इंडिया स्टॉक एक्स्चेंज शाखेचा कोड आहे जी मुंबईत आहे. त्यामुळे ४०० म्हणजे मुंबई ०१३ म्हणजे त्या बँकेला रिझव्र्ह बँकेने दिलेला क्रमांक आणि ०५१ हा बँकेने स्टॉक एक्स्चेंज शाखेला दिलेला अंतर्गत क्रमांक. या बँकेच्या बोरिवली शाखेचा टकउफ कोड ४०००१३००७ असा आहे कारण बाकी तपशील तोच फक्त बोरिवली शाखेचा क्रमांक ००७.