खरेदीचा जोर ओसरल्याने मौल्यवान धातू सोन्यात गेले काही दिवस सलग नरमत आले असून, तोळ्याचा भाव तर आता २६ हजारांच्याही खाली आला आहे. मंगळवारी स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी कमी होत २६ हजाराच्या आत, २५,९५५ पर्यंत घसरले. तर शुद्ध सोन्याचा दर २६,१०५ रुपयांवर स्थिरावला. गेल्याच आठवडय़ात सोने दराने एकाच व्यवहारात गेल्या १५ महिन्यांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली होती. ३१ ऑक्टोबर रोजी सोने थेट ६२० रुपयांनी खालावले. दिवाळीदरम्यान सोन्याचा भाव २८ हजार रुपयांवर होता. सोन्याचे दर तूर्त मोठय़ा प्रमाणात घसरणार नाहीत; डिसेंबर मध्याला अथवा अखेरीस ते २४,५०० रुपयांपर्यंत येण्याची शक्यता मोतीलाल ओस्वालचे किशोर नरणे यांनी व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
सण संपले.. सोनेही उतरले!
खरेदीचा जोर ओसरल्याने मौल्यवान धातू सोन्यात गेले काही दिवस सलग नरमत आले असून, तोळ्याचा भाव तर आता २६ हजारांच्याही खाली आला आहे. मंगळवारी स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅममागे १७५ रुपयांनी कमी होत २६ हजाराच्या आत, २५,९५५ पर्यंत घसरले.
First published on: 05-11-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold decrease in price