Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,५५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६१,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,५५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,५५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,९७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२३ रुपये आहे.

Gold Silver Price on 19 April 2024
Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
gold silver price
Gold-Silver Price on 17 April 2024: सोन्याचे भाव गगनाला भिडले, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर
Gold Silver Price
Gold-Silver Price on 30 March 2024: सोन्याच्या किमतीने उडाली झोप, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.