केंद्रीय अर्थमंत्रालयाने बऱ्याच काळापासून प्रलंबित युको बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक आणि इंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांवर व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्तीची मंगळवारी घोषणा केली.
हैदराबादस्थित आंध्र बँकेवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुरेश एन. पटेल यांची नियुक्ती झाली आहे. ते ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. कोलकातास्थित युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून देना बँकेत कार्यकारी संचालक असलेले आर. के. ठक्कार पदभार स्वीकारतील. कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापकीय संचालकपदी जे. के. गर्ग यांची वर्णी लागली आहे.
कॉर्पोरेशन बँकेचे विद्यमान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जानेवारीमध्ये सेवानिवृत्त होत आहेत, तर इंडियन बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले महेश कुमार जैन यांना पदोन्नती मिळून त्यांनी बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
चार सरकारी बँकांवर प्रमुखांच्या नेमणुका
हैदराबादस्थित आंध्र बँकेवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुरेश एन. पटेल यांची नियुक्ती झाली आहे.
First published on: 04-11-2015 at 02:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government appoints m k jain s patel and r k takkar to head psu banks