नवी मुंबई आणि ठाण्यात अनेक परवडणाऱ्या किमतीतील ‘नॅनो हाऊसिंग’ प्रकल्प यशस्वी करणाऱ्या हावरे बिल्डर्सकडून      कल्याणजवळ मुठवळ येथे याच धर्तीचा ‘हावरे पिनॅकल’ प्रकल्प आकार घेत आहे.
एक आणि दोन बीएचके श्रेणींची ही नॅनो घरे परवडणाऱ्या किमतीत आणि तरीही बांधकामाच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता व आधुनिक जीवनशैलीला साजेशा स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्फी थिएटर, लायब्ररी, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, लॅण्डस्केप गार्डन, इनडोअर गेम्स रूम अशा अत्याधुनिक सोयींसह उपलब्ध झाली आहेत, असे हावरे बिल्डर्सचे संचालक अमित हावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कल्याण स्थानकापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हावरे पिनॅकलमध्ये घरासाठी २५ हजार रुपये भरून बुकिंग करण्याचे आवाहन करताना, त्यांनी २२ ते २९ जानेवारी दरम्यान किमतीत भरघोस सवलत देणाऱ्या विशेष शुभारंभी सप्ताहाचीही घोषणा केली आहे.