एचडीएफसी बॅंकेने हाज आणि उमराह यात्रा करणाऱ्या लोकांसाठी एक फॉरेक्सप्लस कार्ड सादर केले आहे. यात्रेकरु हे कार्ड वापरून यात्रेदरम्यानचे सर्व खर्च सुरक्षितपणे करू शकतील आणि त्यासाठी सौदी रियाल रोख बाळगणेही टाळता येईल. या कार्डच्या सहाय्याने एटीएममधूनही पसे काढता येतील.
एचडीएफसी बॅंक व्हिसाबरोबर भागीदार असलेल्या निवडक खरेदी दालनांमधून केलेल्या खरेदीचे पसे या कार्डाच्या सहाय्याने देणाऱ्या यात्रेकरुंना खास सुविधा आणि फायदेही देऊ करणार आहे. हे प्रिपेड परकीय चलनाचे कार्ड देशामधील सर्व शाखांमध्ये मिळू शकेल. एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांबरोबरच अन्यनाही हे कार्ड घेता येईल. यात्रेकरु एचडीएफसी बॅंकेच्या कोणत्याही शाखेमध्ये आवश्यक ते प्रवासाचे कागदपत्र बरोबर नेऊन एक अर्ज प्रपत्र भरुन देऊ शकतात. ग्राहकाला लगेच काउंटरवर हे फॉरेक्स कार्ड दिले जाते. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर ते चार तासांमध्ये कार्यान्वित केले जाईल. या कार्डासह एक बॅकअप कार्डही येते आणि मूळ कार्ड हरवल्यास किंवा त्याचे काही नुकसान झाल्यास हे कार्ड कार्यान्वित करता येते. कार्डामध्ये भरलेली रक्कम समाप्त झाली तर संबंधित हाजीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत बॅंकेच्या कोणत्याही शाखेमधून त्यामध्ये पुन्हा रक्कम भरता येते. या उपक्रमाद्वारे बॅंक सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशामधील ही वार्षकि यात्रा करणे अपेक्षित असलेल्या जवळजवळ १.७ लाख यात्रेकरुंपर्यंत पोहोचणार आहे. यात्रेकरु त्यांच्या सौदी रियालच्या सर्व गरजा या कार्डाद्वारे चटकन आणि सोयिस्कर पद्धतीने भागवू शकतील.