देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी सर्वसमावेशक असे ‘आयसीआयसीआय स्टुडंट ट्रॅव्हल कार्ड’ सादर करत असल्याची घोषणा केली आहे. हे कार्ड परदेशात शिक्षणाशी संबंधित खर्च सुरक्षित आणि सुलभरीत्या करण्याचा विद्यार्थी आणि पालक या दोहोंसाठीचा मार्ग सुकर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध शुल्क आणि दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यास हे कार्ड साहाय्यकारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे पालक या कार्डामध्ये भारतातून पसे भरू शकतात. हे कार्ड जगभरातील एटीएममध्ये स्थानिक चलनात पसे काढण्याचीही सोय विद्यार्थ्यांना देते. या कार्डबरोबर मोफत र्सवकष प्रवास विमा आणि कार्ड हरविल्यास देय विमाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्य कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास जगभरातील १६ प्रमुख ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय टोल फ्री नंबरवर कॉल करून सहजगत्या बदली कार्ड अॅक्टिव्हेट करून घेण्याची सुविधा आहे. या उपक्रमाबद्दल आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सभरवाल म्हणाले, आयसीआयसीआय बँकेचे हे कार्ड विद्यार्थ्यांच्या परदेशातील संपूर्ण शिक्षणकाळातील विविध खर्चाची पूर्तता करण्याची खास सुविधा मिळवून देते. या कार्डाबरोबर ‘इंटरनॅशनल स्टुडंट आयडेंटिटी कार्ड’चे (आयएसआयसी) सदस्यत्वही आहे. त्याच्यामुळे १३० देशांमधील १.२० लाख दुकानांमध्ये ४० हजारांहून अधिक लाभ मिळतात.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
विदेशातील शिक्षण खर्चासाठी ‘आयसीआयसीआय बँके’चे कार्ड
देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी सर्वसमावेशक असे ‘आयसीआयसीआय स्टुडंट ट्रॅव्हल कार्ड’ सादर करत असल्याची घोषणा केली आहे.
First published on: 12-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici bank new card for foreign education expenses