वेगाने शहरीकरण सुरू असलेली अनेकानेक राज्ये आणि देशभरात १०० स्मार्ट शहरांच्या विकासाची सरकारपुरस्कृत योजना पाहता, जगातील दुसरी मोठी उद्वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतात वार्षिक १५ टक्के दराने विकास अपेक्षित आहे.
भारतात आधीच्या १२ वर्षांत १३.३ टक्के विकास दराने दरसाल १८००० उद्वाहनांना मागणी नोंदविली जात असल्याचे आढळून आले आहे. २०१८ सालात भारतात स्थापित वेगवान उद्वाहन संचांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार करणे अपेक्षित आहे. या उद्योगक्षेत्रातील तसेच सरकत्या स्वयंचलित जिन्यांच्या क्षेत्रातील भारतातील आगामी संधींचा वेध घेण्यासाठी सहावे ‘आयईईई’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन येत्या १७ मार्च ते १९ मार्च २०१६ दरम्यान मुंबईच्या यजमानपदाखाली होत आहे.
गोरेगाव पूर्व येथील मुंबई प्रदर्शन संकुलातील या प्रदर्शनाचे उद्घाटन १७ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. जगभरात उद्वाहने व सरकत्या जिन्यांच्या निर्मितीतील अग्रणी कंपन्या, बांधकाम विकासक, वास्तुविशारद आणि अन्य सहभागींची उपस्थिती अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

आज सराफ मोर्चा
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br /> अर्थसंकल्पातून नव्याने लादण्यात आलेल्या उत्पादन शुल्काविरोधात गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या आंदोलनाला उग्र रूप देताना, सोने व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोशिएशन (आयबीजेए)’ने बुधवारी ९ मार्चला सकाळी ११ वाजता मुंबईत आझाद मैदान येथे मोर्चाची हाक दिली आहे. देशातील पाच लाख सराफांचा व्यवसाय आणि त्यांचे ४० लाख कारागिरांच्या रोजीरोटीला मारक ठरणारी उत्पादन शुल्काची तरतूद मागे घेण्याची मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत बंद सुरू ठेवण्याची आयबीजेएने हाक दिली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India elevator market
First published on: 09-03-2016 at 04:06 IST