स्मार्टफोन वापरात भारत देश येत्या दोन वर्षांत अमेरिकेलाही मागे टाकणार असून याबाबत क्रमांक एकवरील चीनचे स्थान मात्र अबाधित राहणार आहे.
स्मार्टफोन वापरात सध्या चीन आघाडीवर आहे. तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. मात्र ईमार्केटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, २०१६ मध्ये २० कोटींसह भारत हा अमेरिकेला मागे टाकेल. तर चीनमधील स्मार्टफोनची संख्या दोन वर्षांत ६२.४७ कोटी होईल.
अमेरिका भारताच्या जवळपास, १९.८५ कोटी राहू शकेल. तर रशिया व जपान हे दोन विकसनशील देश याबाबत अनुक्रमे ६.५० व ६.१२ कोटी स्मार्टफोनसह असतील. २०१६ पर्यंत जगभरातील स्मार्टफोनची संख्या २ अब्जांहून अधिक होईल.
येत्या दोन वर्षांत ती दुहेरी आकडय़ात वाढेल. गेल्याच वर्षांत एक अब्ज स्मार्टफोनचा टप्पा विश्वाने ओलांडला. २०१४ अखेर चीनमधील स्मार्टफोन ५१.९७ कोटी, अमेरिकेतील १६.५३ कोटी, भारतातील १२.३३ कोटी, जपानमधील ५.०८ कोटी तर रशियातील ४.९० कोटी स्मार्टफोन असतील.