इंडोको रेमेडिजच्या गोव्यातील नव्या प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. कंपनीच्या या प्रकल्पाला (एक) अमेरिकेकडून स्थापना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्य हाती घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, गोवा प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर इंडोको रेमिडिजचा समभाग मंगळवारच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तब्बल १७.४४ टक्क्य़ांपर्यंत झेपावला. दिवसअखेर तो सोमवारच्या तुलनेत ११ टक्क्य़ांपर्यंत वाढत २९६.७५ वर स्थिरावला.
इंडोको रेमेडिजच्या या प्रकल्पाची औषधनिर्मिती क्षमता ३ अब्ज गोळ्या, ३.१० कोटी द्रव औषधे बाटल्या, १.५० कोटी मलम टय़ुब तसेच ६ कोटी जिलेटीन कॅप्सुल असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
‘इंडोको’च्या गोवा प्रकल्पाला अमेरिकी नियामकाची मान्यता
इंडोको रेमेडिजच्या गोव्यातील नव्या प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-03-2016 at 05:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indoco remedies gains 12 on usfda approval for goa facility