शेतकऱ्यांना व शेतीला आíथक मदत पुरवण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमíशयल फायनान्स लिमिटेड (सफल) या बिगर बँकिंग वित्तसंस्थेने महिन्यापूर्वी दाखल केलेल्या व्याजमुक्त पतपुरवठ्याचा लाभ महाराष्ट्रातील विदर्भातील २३ महिलांना देऊ केला आहे. या योजनेच्या २३ महिलांना ५,०३,६१५ रुपयांचे व्याजविरहित आíथक सहाय्य देऊ करण्यात आले आहे. या आíथक मदतीच्या सहाय्याने आíथक आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित असलेल्या विधवांना आपल्या उपजिविकेकरिता आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करण्याकरिता छोटे उद्योग सुरु करता येणार आहेत.
सफलने विदर्भ भागातील शेतकऱ्यांच्या विधवांना कोणतेही तारण न मागता सरळ व्याजावर तीन वर्षांच्या कालावधीकरिता ही आíथक मदत देऊ केली आहे. वर्धा येथे झालेल्या एका सोहळ्यामध्ये १२ महिलांना छोटे व्यवसाय सुरु करण्यास मदत म्हणून धनादेश सुपूर्द करण्यात आले. याशिवाय, यवतमाळ आणि वर्धा जिह्यामधील अजून ११ महिलांना त्यांची धान्य गिरणी, तयार दागिन्यांची, भांडय़ांची, किराणा, सौंदर्यप्रसाधनांची दुकाने सुरू करण्याकरिता, जवळपासच्या तलावांमधून पाणी उपसा करण्याकरिता मोटर पंप, डिझेल इंजिन खरेदी करण्याकरिता आणि वापराविना पडून असलेल्या जमिनीवर तुषार सिंचन सुरू करण्याकरिता धनादेश सुपूर्द करण्यात आले.
वध्र्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी आशुतोष सलिल, वर्धा शहराचे तहसिलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी राहुल ए. सारंग, वध्र्याच्या सेलसुरा गावातील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश यू. नेमाडे आदी यावेळी उपस्थित होते. ‘सफल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरिवद एम. सोनमाळे म्हणाले, अनेक वष्रे भारतीय शेतकरी कृषी क्षेत्र आणि तेथील साधनसंपत्तीच्या विकासानासाठी वेळेवर, पुरेसा आणि परवडणारा भांडवल पुरवठा मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना शाश्वत उपाययोजना उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून त्यायोगे शेतकरी बांधवांचा एक चिरकालीन विकास आणि कार्यक्षमता उभारणी साध्य होईल.