केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत शनिवारी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील गरिबीला नाही तर, गरिबांनाच संपवणारा असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जेटली यांनी आयकरात कोणतीही सूट न देता सामन्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपती धार्जिणा असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे जेटलींचा अर्थसंकल्प सामन्यांसाठी नसून कॉर्पोरेट आणि श्रीमंतांसाठी दिलासा देणारा असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. सदर बजेटबाबत राजकारणी वर्गातून संमिश्र प्रतिक्रीया येताना दिसत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या अर्थसंकल्पात समिती, आयोग आणि फक्त आश्वासने याशिवाय दुसरे काहीच भरीव नसल्याची टीका  काँग्रेसचे माजी मंत्री कमलनाथ यांनी केली.

यंदाच्या अर्थसंकल्पाचे वर्णन  ‘कही खुशी, कही गम’ असे करता येईल, असल्याची सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली.

कॉर्पोरेट बजेट, गरीब आणि शेतकरी वर्गासाठी काहीच नाही -अशोक चव्हाणांनी टीका

अर्थसंकल्प हा गुंतवणुकीला चालना देणारा असून कर आकारणीबद्दल असलेले संभ्रमही अर्थसंकल्पातून दूर झालेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

 बजेट सर्वसामान्यांसाठी समाधानी असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया.

अर्थसंकल्प हे फक्त व्हिजन डॉक्यूमेंट होते, जेटलींनी मांडलेला अर्थसंकल्प हा फक्त उद्योजकांचाच – काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि पुढील पाच वर्षे आर्थिक स्थिरता देणारा हा अर्थसंकल्प आहे. आरोग्य योजना आणि पेन्शन योजना आणून सामान्यांना दिलासा देण्यात आला आहे. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली ६८ हजार ९६८ कोटीची तरतूद म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेला हा प्रयत्न आहे. उच्च शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठीही या अर्थसंकल्पात सकारात्मकरित्या विचार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये औषध संशोधन संस्था उभारण्याची घोषणा म्हणजे राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेबरोबर संशोधनला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. राज्यांना अधिक निधी देण्याचे उद्दिष्ट चांगले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘टीम इंडिया‘चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. गुंतवणूक वाढविणे, रोजगार निर्मिती, उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन, डिजिटल इंडिया आणि कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढविणे ही अर्थसंकल्पाची उद्दिष्टे आहेत.-विनोद तावडे

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaitleys budget is for corporates and the wealthy not for commonman says nawab malik
First published on: 28-02-2015 at 01:15 IST