परवाना रद्दबातल होऊन पंख छाटली गेलेली नागरी हवाईसेवा ‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी उजाडली तरी व्यवस्थापनाने हमी दिलेले मे महिन्यातील्थकीत वेतन अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या महिन्यात २६ दिवसांच्या संपानंतर कर्मचाऱ्यांनी सेवेत रूजू होताना, मार्चमधील थकीत वेतन ताबडतोबीने, एप्रिलचे वेतन ३१ ऑक्टोबपर्यंत आणि मे महिन्याचे वेतन दिवाळीच्या सुट्टीपूर्वी म्हणजे १३ नोव्हेंबरपूर्वी दिले जाईल, असे व्यवस्थापनाकडून आश्वासन मिळविले होते.
किंगफिशरच्या व्यवस्थापनाने जरी मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत वेतन कर्मचाऱ्यांना दिले असले तरी ठरलेल्या १३ नोव्हेंबरपूर्वी मेचे थकीत वेतन अद्याप दिलेले नसल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी दिलेले वचन न पाळून, ३००० कर्मचाऱ्यांना ही चांगलीच दिवाळीची भेट दिली आहे, अशी किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची भावना बनली आहे.
जवळपास ९००० कोटी रुपयांचा संचयित तोटा आणि सुमारे ८००० कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज (तेही जानेवारी २०१२ पासून थकलेले) अशा आर्थिक भयंकर पेचात सापडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पल्लवित होतील, असे अलीकडेच संकेत दिसून आले. किंगफिशरच्या प्रवर्तक यूबी समूहातील आघाडीची कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने डिआजियो या ब्रिटिश मद्य कंपनीला आपल्या ५४.३ टक्के भांडवली हिश्श्याची विक्री करून त्याचा मोबदला म्हणून ११,४०० कोटी रुपयांची (२.१ अब्ज अमेरिकी डॉलर) कमाई केली आहे. यातून किंगफिशर एअरलाइन्समध्येही आंशिक गुंतवणूक प्रवर्तक समूहाकडून केली जाणे अपेक्षित आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘किंगफिशर’ कर्मचाऱ्यांना दिवाळी ‘भेट’!
परवाना रद्दबातल होऊन पंख छाटली गेलेली नागरी हवाईसेवा ‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी उजाडली तरी व्यवस्थापनाने हमी दिलेले मे महिन्यातील्थकीत वेतन अद्याप मिळू शकलेले नाही. गेल्या महिन्यात २६ दिवसांच्या संपानंतर कर्मचाऱ्यांनी सेवेत रूजू होताना

First published on: 14-11-2012 at 12:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kingfisher employees in dark on diwali