भारतीय आयुर्विमा महामंडळाची पॉलिसी (LIC) अनेक भारतीयांच्या विश्वासावर खरी राहिली आहे. यामुळे कोट्यवधी लोक एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत आहेत. एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC Bachat Plus Policy), लोकांना जीवन विम्याव्यतिरिक्त इतर अनेक फायदे मिळतात. एलआयसीची अशीच एक बचत प्लस योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर सुरक्षिततेसह बचतीचा पर्याय मिळतो. यामध्ये गुंतवणूक करून, तुम्ही भविष्यासाठी एक चांगला निधी देखील तयार करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी पुढे जाऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलआयसीच्या बचत प्लस योजनेचे फायदे

एलआयसीच्या या विशेष योजनेमध्ये सुरक्षिततेसोबतच बचतीचीही हमी दिली जाते. या पॉलिसीप्रमाणे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. तसेच, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम दिली जाते.

(हे ही वाचा: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत करणार शनिदेव प्रवेश! ‘या’ ४ राशींना मिळेल नोकरी आणि व्यवसायात चांगला नफा)

किती प्रीमियम भरावा लागेल?

LIC च्या बचत प्लस योजनेत प्रीमियम एकदा किंवा ५ वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी भरला जाऊ शकतो. या योजनेतील प्रीमियम वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक जमा केले जाऊ शकतात. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये, ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो. परंतु वाढीव कालावधीत प्रीमियम भरला नाही, तर पॉलिसी रद्द होते आणि त्याचा लाभ मिळत नाही.

(हे ही वाचा: पोस्‍ट ऑफिस की SBI कोण देणार नवीन वर्षात FD अधिक रिटर्न? जाणून घ्या)

कर्ज घेता येते

या योजनेअंतर्गत ग्राहकांना कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. पॉलिसीचे ३ महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा फ्री लूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिंगल प्रीमियम पर्यायामध्ये कर्ज मिळू शकते. तर मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्यायामध्ये, किमान २ वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर कर्ज उपलब्ध होईल. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम १ लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही.

(हे ही वाचा: आता तुम्ही PF Account स्वतः करू शकता ट्रान्सफर, EPFO ​​ने सुरु केली ऑनलाइन प्रक्रिया; जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

पॉलिसीसाठी अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता. ऑनलाइन पॉलिसी घेण्यासाठी, तुम्हाला http://www.licindia.in वर जाऊन गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, ऑफलाइन घेण्यासाठी, तुम्हाला एलआयसीच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच, तुम्ही एलआयसीच्या बचत प्लस योजनेत आयकराच्या कलम ८० सी अंतर्गत सूट देखील घेऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic savings plus plan has a double benefit life insurance benefits with savings know the details ttg
First published on: 03-01-2022 at 15:46 IST