‘म्हाडा’ मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी उद्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शनपर कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नियोजनबद्ध गुंतवणुकीतून संपत्तीनिर्मिती तसेच भविष्यातील तरतुदीविषयीचे मार्गदर्शन म्हाडा कर्मचाऱ्यांना उपलब्ध होत आहे. निवाऱ्याच्या शोधातील मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या या निमशासकीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांना यानिमित्ताने गुंतवणूकविषयक नानाविध शंकांचे निरसन करण्याची संधी निर्माण झाली आहे.

‘लोकसत्ता अर्थसल्ला’ ४ी गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर उपक्रम बुधवार, २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता म्हाडाच्या मुख्यालयात होत आहे. गृहनिर्माण संस्थेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी गुंतवणुकीतून संपत्तीनिर्माणाचे मर्म उलगडले जाईल.

‘म्ंयुच्युअल फंड सही आहे’ या म्युच्युअल फंडविषयक जनजागृती करणाऱ्या संस्थेमार्फत प्रस्तुत आणि ‘सीडीएसएल’ ही डिपॉझिटरी सेवा सहप्रायोजक असलेला हा अर्थसाक्षरतेचा उपक्रम ‘लोकसत्ता’ पुढाकाराने होत आहे.

वांद्रेस्थित म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावरील कॅन्टीनमध्ये होत असलेला हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यात म्हाडाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सहभाग घेता येईल.

महागाईच्या वेगाशी स्पर्धा करू पाहणारे वेतन आणि उत्पन्न व खर्च यांचा मेळ राखताना अधिक बचत आणि नियोजनबद्ध गुंतवणूक आíथक आव्हानांवर मात करणारी ठरू शकते. जीवन सुखकर करण्यासाठी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा गुंतवणूक हाच एक सशक्त मार्ग मानला जातो. त्याकरिता आíथक शिस्तीवर बेतलेल्या आíथक नियोजनाचे कानमंत्र यानिमित्ताने उपस्थित तज्ज्ञांकडून दिले जाणार आहेत. गुंतवणूकदारांना प्रश्न आणि शंकाही यानिमित्ताने तज्ज्ञांना थेट विचारता येतील.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’चे पदाधिकारी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणन प्रमुख संदीप वाळुंज हे ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ यावेळी उलगडून सांगतील. तर ‘सीडीएसएल’चे आर्थिक साक्षरता विभाग प्रमुख अजित मंजुरे हे यानिमित्ताने ‘डीमॅटचे लाभ’ विशद करतील. म्युच्युअल फंड, समभाग गुंतवणुकीची परतावा कामगिरी, आर्थिक स्वप्नपूर्तीसाठी या पर्यायांचा सुयोग्य वापर, त्यातील जोखीम घटक आणि कर कार्यक्षमतेचे लाभही सांगितले जातील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arthsalla event in mhada office for employee guidance
First published on: 22-01-2019 at 01:39 IST