१६ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मिहद्रा समूहाच्या भाग असलेल्या, मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा लि. (एम अ‍ॅण्ड एम) व मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (एमएमएफएसएल), या दोन्हींची विकसनशील निर्देशांकांतर्गत डीजेएसआय निरंतरता निर्देशांकामध्ये निर्देशांक घटक म्हणून निवड झाली आहे.
या निर्देशांकावर चीन, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिक, मलेशिया, कोलंबिया, टर्की व तवान येथील एकूण ८७ कंपन्या आहेत. भारतातून ८९ पेक्षा जास्त कंपन्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते ज्यांमधून अंतिमतऱ् ह्या निर्देशांकामध्ये मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा लि. व मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. यांचा समावेश धरून ९ कंपन्यांना समाविष्ट करण्यात आले. सदर निर्देशांकामध्ये समावेश असलेली एमएमएफएसएल ही बँकिंग व वित्तीय सेवाक्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी आहे.
१९९९ मध्ये सुरु झालेल्या डीजेएसआय हे जगभरातील आघाडीच्या निरंतरता कायम असलेल्या कंपन्यांची वित्तीय कामगिरीची नोंद ठेवणारे पहिले जागतिक निर्देशांक होते. हे निर्देशांक डीजेएसआय ग्लोबल टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स (बाजार भांडवलाविषयी) वर सूचित असलेल्या सर्वात मोठ्या २,५०० कंपन्यांच्या निरंतर कामगिरीचे मूल्यमापन करते. डीजेएसआय परिवारातील डीजेएसआय वर्ल्ड हा मुख्य जागतिक निर्देशांक आहे व भौगोलिक परिस्थितीवर आधारित इतर बरेच निर्देशांक आहेत.
सामाजिक जबाबदारीबाबत असलेली प्रतिष्ठा ही एखाद्या फर्मची किंमत वाढवणारी एक अशाश्वत मालमत्ता आहे. अंदाज बांधता न येणारया अशा वाढत्या आíथक वातावरणात, डीजेएसआय सारखे निर्देशांक गुंतवणूकदारांना कंपनीच्या कामिगिरी व भावी क्षमतेबाबत दीर्घ काळासाठी परिपूर्ण असा दृष्टीकोन पुरवतात ज्यामुळे त्यांना योग्य माहितीच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेता येतात, असे मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्रा लि. ग्रुप सस्टेनेबिलीटी कौन्सिलचे अध्यक्ष, उल्हास यर्गोप सांगतात.
या वर्षीच्या सूचीमध्ये मिहद्रा समूहाच्या दोन कंपन्या झळकल्या आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. दैनंदिन उपक्रमांमध्ये निरंतरता प्रवíतत करण्यापासून ते सक्षम फायद्यासाठी नियोजितपणे निरंतरता पत वाढवण्यास समूह कंपन्यांची मदत करण्यापर्यंत मिहद्रामध्ये निरंतरता ही कायम उद्योगाचा महत्वाचा भाग राहिलेली आहे व या मानाच्या निर्देशांकामधील आमचा समावेश म्हणजे आमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचा जाहीर दृष्टांत आहे,ज्ज् असे मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा लि. च्या ग्रुप सस्टेनेबिलीटी सजे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, बेरोझ गाझदार म्हणाले. मुंबई, अमेरिकन डॉलर्सची बहुराष्ट्रीय कंपनी असलेली मिहद्रा १०० देशांमध्ये कार्यरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहर्ता काय, महिंद्र पात्र कसे..
डीजेएसआयमध्ये समावेश होण्यासाठी, कंपन्यांचे मुल्यांकन केले जाते व त्यांच्या दीर्घ कालीन इएसजी अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्लॅन्सनुसार त्यांची निवड केली जाते. भाग घेणारया संस्थाना त्या कार्यरत असलेल्या क्षेत्राशी संबंधित प्रश्नावलीची उत्तरे द्यावी लागतात व प्रत्येक क्षेत्रातील पहिल्या १० (मुल्याधारणेतील गुणांनुसार) संस्थांची निवड सदर निर्देशांकासाठी होते. प्रत्येक कंपनीचे ३ परिमाणांतर्गत (आíथक, पर्यावरणीय व सामाजिक) १००० डेटा पॉईंट्सवर आधारित मुल्यांकन होते. वेबवर आधारित प्रश्नावली, कंपनीची कागदपत्रे, कंपनीचे परस्पर व्यवहार आणि मिडिया व भागधारक अन्वेषण ह्यांचा मुल्यांकनामध्ये समावेश होतो. डीजेएसआयच्या सदस्यत्वामुळे मिळणारे वाढीव ब्रँड मूल्य व वाढलेली भागाची किंमत हे प्राथमिक लाभ आहेत. सामाजिक जबाबदारीसाठी स्वतऱ् तपास न करणारे बरेच सामाजिक जबाबदार गुंतवणूकदार (एसआरआय) डीजेएसआयचा वापर करतात. डीजेएसआयमध्ये समाविष्ट झाल्यामुळे, कंपन्या सामाजिक जबाबदार गुंतवणूक (एसआरआय) मध्ये समाविष्ट होण्यासही पात्र ठरला.

मित्सुई – चायना  स्टील  ग्लोबलचा भारतीय  सेवा उभारणीसाठी  २४ डॉलर खर्च
मिहद्रा  इंटरट्रेड  या  कंपनीने  चायना  स्टील  ग्लोबल  ट्रेडिंग  कॉर्पोरेशन  आणि  सिंगापूरच्या  मित्सुई  अँड  कंपनी  (एशिया  पॅसिफिक) सोबत  संयुक्त  उपक्रम  सुरू  केल्याचे  जाहीर  केले.  या  उपक्रमाच्या  माध्यमातूनपुण्याजवळील  चाकण   औद्योगिक  परिक्षेत्रात  ऑटोमोटिव्ह  स्टील  सíव्हस  सेंटर उभारण्यात  येणार  आहे.  ही  सेवा  उभारण्यासाठी २४  मिलियन  अमेरिकन  डॉलर  खर्च  येणार  आहे.  हा  प्रकल्प  १० एकर  जमिनीवर  उभारण्यात  येणार  असून, २०१र्५ पर्यंत  याची  वार्षकि  प्रक्रियाक्षमता  १  लाख  ३० हजार  टन  इतकी  असेल.  संयुक्त  उपक्रमात  मिहद्रा  इंटरट्रेडची  भागीदारी  ५१ टक्के  असेल,  तर अन्य  दोन  भागीदारांचा  वाटा  प्रत्येकी  २४.५ टक्के  असेल. मिहद्रा  इंटरट्रेड  लि.चे  व्यवस्थापकीय  संचालक  हर्ष  कुमार  याबाबत म्हणाले,  व्यवसाय अनुकूल  राखण्यासाठी  स्टील  ब्लँक्स  आणि  प्रोफाइल्सची  सेवा  देणाऱ्या  काही  मोजक्याच  व्यापारी  उत्पादकांकडून राज्यातील  ही  आधुनिक  सुविधा  देण्यात  येणार  आहे.  मिहद्राची  ही  सातवी  स्टील  प्रक्रिया  सेवा  असेल  आणि  पुणे  विभागातील  तिसरी  सेवा  असेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra and mahindra ltd and mahindra finance selected in djsi index list
First published on: 19-11-2013 at 12:06 IST