जकातपर्यायी स्थानिक संस्था करावरून सध्या सुरू असलेले अनेक उलटसुलट प्रवाह आणि व्यापाऱ्यांमधील साशंकता पाहता, ही करप्रणाली नेमकी काय आहे, याबाबत व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांमध्ये जाणीव-जागृतीसाठी ‘मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळा’ने पुढाकार घेतला आहे. एलबीटी लागू झाल्यास व्यापारी व ग्राहकांवर त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतील, हे समजावून सांगणाऱ्या प्रसिद्ध करसल्लागार दीपक बापट यांच्या दोन व्याख्यानांचे मंडळाने आयोजन केले आहे. बुधवारी २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, चित्तपावन ब्राह्मण संघ, निकतवारी लेन, गिरगाव येथे, तर शुक्रवारी २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, अखिल भारतीय कीर्तन संस्था (विठ्ठल मंदिर), जोशी सभागृह, डी. एल. वैद्य मार्ग, दादर (प.) येथे होत असलेली ही व्याख्याने सर्वासाठी खुली व विनामूल्य आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
‘एलबीटी’विषयक जनजागरणात मराठी व्यापारी मित्रमंडळाचा पुढाकार
जकातपर्यायी स्थानिक संस्था करावरून सध्या सुरू असलेले अनेक उलटसुलट प्रवाह आणि व्यापाऱ्यांमधील साशंकता पाहता, ही करप्रणाली नेमकी काय आहे, याबाबत व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांमध्ये जाणीव-जागृतीसाठी ‘मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळा’ने पुढाकार घेतला आहे.
First published on: 22-05-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi merchants friend circle come forward for awareness of lbt