देशाच्या आर्थिक राजधानीत पूर्णवेळ वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या चालकांचे वेतन गेल्या दोन वर्षांत तब्बल ५३ टक्क्य़ांनी वधारले आहे. ‘बाबाजॉब.कॉम’ या श्रमजीवी वर्गासाठी रोजगार शोधणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.
मुंबईत पूर्णवेळ वाहन चालक म्हणून काम करणाऱ्यांचा महिन्याचा सरासरी पगार गेल्या दोन वर्षांत ८,३०० रुपयांवरून १२,७०० रुपयांवर गेला आहे. दोन वर्षांतली ही वाढ सुमारे ५३ टक्के आहे.
गेल्या काही काळात कॅब सेवा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चालकांसाठीची मागणी मोठी आहे. वाहन चालकांची मासिक मिळकत जवळपास तिपटीने वाढली आहे. ‘बाबाजॉब.कॉम’मुळे देखील चांगला पगार देणारी नोकरी आवाक्यात आली असल्याचा दावाही यानिमित्ताने करण्यात आला आहे. हे संकेतस्थळ रिसेप्शनिस्ट, बीपीओ, कॉल सेंटर, रिटेल, विक्री आणि विपणन क्षेत्रातही रोजगार उपलब्ध करून देते.
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. ब्लाग्जवेड्त यांनी सांगितले की, नोकरी शोधणाऱ्यांशी अनौपचारिक पद्धतीने संपर्क साधून आम्ही त्यांना नोकरी देणाऱ्या योग्य ठिकाणाशी जोडून देतो आणि साजेशी नोकरी मिळवून देतो. कंपनीच्या क्रमांकावर संपर्क साधला असता इच्छुकांना ज्या परिसरात काम करायला आवडेल तेथे संधी दिली जाते.
सी. एन. ब्लाग्जवेड्त यांनी २००७ मध्ये बंगळुरुमध्ये बाबाजॉब.कॉमची स्थापना केली. बाबाजॉबपूर्वी त्यांनी मायाक्रोसॉफ्टसोबत मध्ये नऊ वर्ष काम केले आहे. बाबाजॉबची सुरुवात त्यांनी एक प्रयोग म्हणून केली होती. वेब, मोबाइल, सोशल नेटवर्क यांच्या मदतीने रोजगारांना संधी मिळण्याच्या हेतूने आपण हा उपक्रम सुरू केल्याचेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
मुंबईतील वाहन चालकांच्या वेतनात दोन वर्षांमध्ये ५३ टक्के वाढ
देशाच्या आर्थिक राजधानीत पूर्णवेळ वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या चालकांचे वेतन गेल्या दोन वर्षांत तब्बल ५३ टक्क्य़ांनी वधारले आहे. ‘बाबाजॉब.कॉम’ या श्रमजीवी वर्गासाठी रोजगार शोधणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.
First published on: 04-11-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai drivers salary increases by 53 percent in past two years as per babajob com report