या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातल्या शेकडो शहरांमध्ये ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत वीज वितरण व्यवस्था उभारली जात असताना मुंबईमध्ये मात्र ग्राहक राजाला उपलब्ध वीज वितरण परवानाधारकांमधून आपला वीज वितरक निवडायचा अधिकार मिळाला आहे. नवे तंत्रज्ञान, उत्तम कार्यक्षमता, तोटा नियंत्रणात ठेवणे, उच्च दर्जाची ग्राहक सेवा, उर्जा व्यवस्थापन, पारदर्शकता, वाढीव कार्यक्षमता, सुधारित उर्जा व्यवस्थापन, ग्राहक अधिकारांचे ज्ञान आणि प्रभावी तक्रार निवारण यांच्याद्वारे क्षेत्रीय कामगिरीच्या स्पर्धेत सुधारणा होत गेली. याबाबत टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचलन अधिकारी अशोक सेठी यांच्याशी केलेली बातचीत –

मुंबईत मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास पाहता मुंबईच्या विजेची वाढ किती टक्के वाढेल ?

नजीकच्या भविष्यकाळात मुंबईत मोठय़ा प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे, हे खरे. यात मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक प्रणाली, मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या नव्या बांधकामांमुळे लागणारे पाणी व त्याच्याशी निगडित जलनियोजन, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातूनही मोठे प्रकल्प उभारण्यात येत असल्याने आगामी भविष्यकाळात विजेच्या मागणीतही मोठी वाढ होणार आहे. मुंबईच्या विजेची वाढ ही २०१७-१८ करिता ३,८२५ मेगावॅट असून ती २०३० पर्यंत ६,४३० मेगावॅट वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे प्रति वर्ष ४ टक्के वाढ विजेच्या मागणीत होत आहे.

अखंड वीजपुरवठा देण्यासाठी सर्वच संबंधित वीज वितरक कंपन्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार घेणे आवश्यक आहे का?

वितरण कंपन्यांना अखंड ऊर्जा पुरवण्यासाठी नवीन उपRम राबविणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणजे आयलॅंडिंग प्रणाली. मुंबईत अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली १९८१ मध्ये विकसित करण्यात आली होती. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, मुंबईबाहेरून केंद्रीय वीज जाळ्यांमधून येणारा वीज पुरवठा खंडित झाल्यास या आयलँडिंग प्रणालीचा वापर करून ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत सुरू राहील. या कालावधीत बाहेरील ग्रीडमधून वितरणाचे नेटवर्क वेगळे करून मुंबई शहर भागातील वीजनिर्मितीच्या स्त्रोतांचा वापर करत वीजपुरवठा अखंड ठेवण्यात येईल. या आयलँडिंग प्रणालीने सर्व आवश्यक सेवांना निरंतर वीजपुरवठा  केला आहे आणि गेल्या तीन दशकांपासून मुंबईला अखंड आणि विश्वसार्ह पुरवठय़ाची निश्चिींती दिली आहे. अन्य वीज वितरकांचे सहाय्य मिळाल्यामुळेच ही प्रणाली १९९७ पासून सतत यशस्वी ठरत आली आहे

मुंबईला स्मार्ट शहर बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो?

कोणत्याही शहराला स्मार्ट शहर बनण्यासाठी वीजपुरवठय़ाची विश्वासार्हता व स्थिरता आवश्यक आहे. घरे आणि व्यावसायिक आस्थापनांना अखंड वीजपुरवठा  करण्याबरोबरच, ई—गव्हर्नन्स, कुशल वाहतूक व्यवस्थापन, वायफाय कनेक्टिव्हिटी, सीसीटीव्ही, कमांड व कंट्रोल सेंटर इत्यादी अनेक स्मार्ट उपRमांना अखंडित वीजपुरवठा होणे आवश्यक असते. स्मार्ट सिटीजसारख्या प्रस्तावित योजनांसह आजच्या काळात ‘आयलँडिंग योजना’ अधिक उपयुक्त ठरते. स्मार्ट शहरांना उपयुक्त स्वयंचलित आणि नवीन तंत्रज्ञान अवलंब करणे आवश्यक आहे.  मुंबईमध्ये वीज कंपन्यांनी ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले आहेत. वितरण ऑटोमेशन प्रणालीमुळे कोणत्या भागांत वीजपुरवठा खंडित झाला याची माहिती त्वरित मिळून तात्काळ पुरवठा पूर्ववत करता येतो, तर टाटा पॉवरसारख्या कंपन्यांनी शोधलेल्या स्वयंचलित ग्रिड यंत्रणेमुळे एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्रिडमार्फत यामागील दोष शोधून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येतो. असा प्रकार घडल्यास याची माहिती ग्राहकांना मोबाइल अ‍ॅप, संकेतस्थळ, आयव्हीआरएस आणि एसएमएससारख्या माध्यमातून तात्काळ पुरवण्यात येते. संपूर्ण वीजवितरण यंत्रणा जीआयएसद्वारे मॅप केल्याचा मोठा फायदा वितरण कंपन्यांच्या अभियंत्यांना मिळतो. मुंबईने वीज पुरवठा वापर, मागणी व्यवस्थापन उपRमाअंतर्गत सादर केलेले अन्य उपRम,  मागणी प्रतिसाद, ग्राहकांना सक्षम बनविण्यासाठी स्मार्ट मिटरिंग यासारखी  ऑनलाईन माहिती सादर करण्यासाठी पावले उचलली आहेत. वितरण कंपन्यांनी या संकल्पनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

वीज वितरणाबाबत काय सुधारणा व्हाव्यात, असे आपल्याला वाटते ?

वीजवितरण क्षेत्राच्या खासगीकरणाने या क्षेत्रात दूरगामी बदल घडवून आणले आहेत. वीजवितरण क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांमुळे वेळेची बचत, यामुळे होणारे अन्य फायदे आणि त्यातून मिळालेले यश देशपातळीवर कार्यान्वित केल्यास त्याचा अनेकपटीने फायदा होऊ  शकतो. ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळवून देणे, अधिक किफायतशीरपणे काम करणे, तोटय़ात घट करणे आणि यासर्वासह भरवशाचा अखंड वीजपुरवठा करणे, या सर्वाची सांगड घालणारे प्रारुपच या क्षेत्रासाठी सर्वोत्तम ठरेल.

अंतर्गत वीजनिर्मितीचे व्यवस्थापन किंवा नूतनीकरण करण्याच्या पर्यायांबाबत काय सांगाल ?

वितरणाच्या दिशेने जसे जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे तसेच अंतर्गत वीजनिर्मितीचे व्यवस्थापन किंवा नूतनीकरण करण्याच्या पर्यायांचाही विचार करणे फायदेशीर ठरेल. शहरातील विजेचा मागणीचा वेग वाढलेला असल्याने, जोखीम दृष्टीकोनातून वीजपुरवठा विश्वासार्हतेवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे वीज पुरवठय़ाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने वितरण वृद्धी आणि अंतर्गत वीजनिर्मिती यामधील संतुलन राखणे आवश्यक आहे. मुंबईसारख्या शहरांसाठी विश्वासार्हतेत सर्वोत्कृष्टता राखण्यासाठी सर्व भागधारकांनी या विषयावर विचारविमर्श करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai electricity demand
First published on: 04-07-2017 at 02:27 IST