बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने ऑनलाइन व इलेक्ट्रॉनिक धाटणीची ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या (केवायसी)’ प्रक्रिया सुरू केली आहे.
म्युच्युअल फंडांत पहिल्यांदाच गुंतवणूक करत असलेल्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची मुभा याद्वारे देण्यात आली आहे. गुंतवणूकदार आता प्रत्यक्ष केंद्रांना भेट न देता दूरस्थ स्थानांवरून (डिजिटल पद्धतीने) त्यांचा तपशील आणि कागदपत्रे सादर करून बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची तीन सुलभ टप्प्यांतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. बिर्ला सन लाइफ एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमण्यन यांनी सांगितले की, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी नवीन ई-केवायसी प्रक्रिया ही गुंतवणुकीचे व्यवहार निश्चितच सत्वर व सुकर करणारी ठरेल. देशांतर्गत, अनिवासी भारतीयांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2015 रोजी प्रकाशित
बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची नवीन ई-केवायसी प्रक्रिया
बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने ऑनलाइन व इलेक्ट्रॉनिक धाटणीची ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या (केवायसी)’ प्रक्रिया सुरू केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-12-2015 at 05:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New e kyc process of birla sun life mutual fund