महिंद्रची नवीन स्कॉर्पियो ७.९८ लाखांपासून सुरू

बहुपयोगी वाहन प्रकारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने गुरुवारी नव्या वैशिष्टय़ांसह आपल्या ‘स्कॉर्पिओ’चे नवे रूप प्रस्तुत केले.

बहुपयोगी वाहन प्रकारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने गुरुवारी नव्या वैशिष्टय़ांसह आपल्या ‘स्कॉर्पिओ’चे नवे रूप प्रस्तुत केले. रेनॉच्या डस्टर आणि टाटा सफारी स्टॉर्मना कडवी टक्कर देईल, अशी स्कॉर्पिओची किंमत ७.९८ लाख रुपये ते ११.४६ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम मुंबई) निश्चित करण्यात आली आहे. सात, आठ आणि नऊ अशा आसनक्षमतेत निवडीच्या पर्यायासह नवीन स्कॉर्पिओ उपलब्ध झाली आहे. मुंबईत गोरेगाव येथे महिंद्रचे कार्यकारी संचालक पवन गोएंका यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. देशात आजच्या घडीला साडेचार स्कॉर्पिओधारक असलेले समाधानी ग्राहक असून, नव्या रूपातील स्कॉर्पिओने ही ग्राहक समाधानाची मात्रा आणखी उंचावेल, असा विश्वास गोएंका यांनी व्यक्त केला.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New generation mahindra scorpio launched

ताज्या बातम्या