अतिशय किफायती दर, खरेदी केलेला माल दरवाजांपर्यंत पोहचता केला जाणे आणि पसंतीसाठी ५५ हून अधिक ब्रॅण्ड्सच्या विस्तृत उत्पादनांची उपलब्धता आणि ही खरेदीही घरबसल्या एका क्लिकसरशी करण्याची सोय देणारी ‘ई-पेठ’ नेक्सकॉन टेक्नॉलॉजीज्ने उपलब्ध केली आहे.
कंपनीने आपले संकेतस्थळ ६६६.ल्ली७ूल्ल.्रल्लला सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान उत्पादनांच्या ऑनलाइन उलाढालीचा मंच बनविला आहे. देशात ई-व्यापाराकडे ओढा आणि प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या वापराचा वाढता कल पाहता, पहिल्या वर्षी नेक्सकॉनने १०० लाख डॉलरपल्याड ऑनलाइन उलाढालीचे लक्ष्य निर्धारित आहे.
एप्रिलपासून कंपनीने आपल्या संकेतस्थळावर स्वत:चा संगणक स्वत:च असेम्बल करून परवडणाऱ्या किमतीत बनविण्याची सुविधाही ग्राहकांना देऊ केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
नेक्सकॉनकडून इलेक्ट्रॉनिक्स, संगणकीय उपकरणांची ‘ई-पेठ’
अतिशय किफायती दर, खरेदी केलेला माल दरवाजांपर्यंत पोहचता केला जाणे आणि पसंतीसाठी ५५ हून अधिक ब्रॅण्ड्सच्या विस्तृत उत्पादनांची उपलब्धता आणि ही खरेदीही घरबसल्या एका क्लिकसरशी करण्याची सोय देणारी ‘ई-पेठ’ नेक्सकॉन टेक्नॉलॉजीज्ने उपलब्ध केली आहे.
First published on: 03-04-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nexon electronics offers e peth for computer equipment