भांडवली बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम राहिली. गुंतवणूकदारांचे समभाग खरेदी धोरण गुरुवारीही राहिल्याने प्रतिष्ठित राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाला त्याचा १० हजारांचा टप्पा विनासायास पार करता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात ३४,५०० नजीक पोहोचल्यानंतर दिवसअखेर त्यात बुधवारच्या तुलनेत २८४.०१ अंश वाढ होऊन मुंबई निर्देशांक ३४,१०९.५४ वर स्थिरावला. तर निफ्टीत सत्रअखेर ८२.४५ अंश म्हणजेच ०.८३ टक्के  भर पडून प्रमुख निर्देशांक १०,०६१.५५ पर्यंत पोहोचला.

अमेरिकी मूडीजने भारताचे सार्वभौम पतमानांकन कमी के ल्याच्या घटनेकडे भांडवली बाजाराने फारसे गांभीर्याने घेतले नाही. उलट तीन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावरील जागतिक भांडवली बाजारातील निर्देशांक तेजीला येथेही गुंतवणूकदारांनी साथ दिली.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्र सर्वाधिक, जवळपास ५ टक्के वाढीसह अग्रणी राहिला. तसेच कोटक महिंद्र बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक यांचेही मूल्य वाढले. तर एनटीपीसी, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प आदी २ टक्क्यांनी घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, बँक, वित्त, भांडवली वस्तू,  ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक ३ टक्क्यापर्यंत वाढले. तर दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा निर्देशांकांना एक टक्के पर्यंतच्या घसरणीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक सव्वा टक्क्यापर्यंत वाढले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty crosses 10000 sensex up 285 points abn
First published on: 04-06-2020 at 03:05 IST