बँकांवर अनेकदा संकटे येतात. टीकाही होते. परंतु बँक चालवणाऱ्यांचे मन स्वच्छ असल्यास बँक अयशस्वी ठरत नाही, असे सूचक राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे काढले. मुंबई बँकेच्या मस्जिद बंदर येथील संगणकीकृत शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
‘६,००० कोटींची उलाढाल करणारी मुंबई बँक ही एक यशस्वी बँक आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावेली, ३१ मार्चपर्यंत बँकेचे अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण शून्य टक्क्य़ांवर येईल, असे सांगितले.
‘स्व. वसंतदादा पाटील यांनी जनहितासाठी स्थापन केलेल्या मुंबई बँकेला राजकारणाचा अड्डा होवू देणार नाही. बँकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक थोर नेते बँकेत आले पण त्यांनी कधीही येथे राजकारण आणले नाही,’ असे प्रतिपादन सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांनी यावेळी केले.