व्यवस्थापनाने गैरव्यवहाराच्या आरोपावरून २० कामगारांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ टाटा मोटर्सच्या येथील प्रकल्पातील संप बुधवारीही सुरू राहिला. शनिवारपासून कंपनीतील ३०० कामगार संपावर गेले आहेत. बुधवारी याबाबत अहमदाबाद येथील कामगार विभागासमोर बैठक झाली. यात कामगार संघटना व व्यवस्थापन भूमिकेवर ठाम राहिले.
गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या निलंबित कर्मचाऱ्यांबाबत चौकशी सुरू असून त्यांना सेवेत घेण्यासाठी पुकारण्यात आलेले कर्मचाऱ्यांचे आंदोलन गैर असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वार्षिक २ लाख वाहननिर्मिती क्षमता असलेल्या या प्रकल्पात कंपनीची बहुचर्चित नॅनो तयार होते.